जि.प.प्रशाला व कें.प्रा. शाळा पानवडोद बु या शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकसहभाग चळवळ उभी करण्यात आली आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समिती पानवडोद बु. स्थापन करण्यात आली.
या समितीत कोणी अध्यक्ष , उपाध्यक्ष ,सचिव वा पदाधिकारी नसून आपण सर्व तरुण मंडळ,पालक, ग्रामस्थ माता भगिनी या सदस्य आहेत. सर्व सदस्यांना समान दर्जा असून शाळा विकासासाठी सर्वांचे मत व विचार विचारात घेऊन हि समिती कार्य करते.
लोकसहभागातून १५ ते २० लक्ष रु निधी जमा करून शाळेत डिजिटल बालवर्ग, डिजिटल कलासरुम , ५० संगणक ची अद्यावत computer Lab, विविध शैक्षणिक व खेळाचे साहित्य व शाळेला आवश्यक त्या इतर साहित्य व भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम या समितिने हाती घेतले आहे.
लोकसहभागातून जमा होणारा निधी संकलनासाठी व पारदर्शक व्यवहारासाठी समितीचे बँक खाते उघडण्यात आले असून या खात्यावर जमा होणारा सर्व निधी जमा करून समिती सदस्य यांच्या विचाराने व मान्यतेने शाळा विकास व विद्यार्थी विकासावरच खर्च करण्यात येतो.
खात्याचे नाव :- आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समिती पानवडोद बु.
खाते क्रमांक :- 80056050563
IFSC CODE :- MAHG0005112
बँक नाव :- महाराष्ट्र ग्रामीण बँक पानवडोद बु
शाखा :- पानवडोद बु
कृपया सर्व दाते , पालक व माजी विद्यार्थी , दानशुर व्यक्ती व संस्था , ग्रामस्थ पानवडोद बु व खु विनंती कि आपणही या ज्ञान यज्ञात आपला देणगीरुपी सहभाग नोंदवावा हि नम्र विनंती.
आपण आपली देणगी वरील बँक खात्यावर online जमा करु शकता किंवा प्रशाला कार्यालयात कॅश जमा करून पावती घेऊ शकता.
पानवडोद च्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून प्रशाला व कें.प्रा.शा. पानवडोद बु या शाळेत भौतिक सुविधा निर्माण करणेसाठी खालील दानशूर देणगीदार यांनी देणगी जाहीर करून प्रत्येक्ष खात्यावर जमा केली. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समिती पानवडोद बु या सर्व देणगणीदार यांचेतर्फे खूप खूप आभार व धन्यवाद ....!!!!!
आमचे देणगीदार पाहण्यासाठी येथे clik करा
आमचे देणगीदार @ १०/०४/२०२० पर्यंतचे
देणगी जमा गोषवारा
एकूण जाहीर देणगी -१३७१००४ रु
प्रत्येक्ष खात्यावर जमा देणगी - ५१७६५२ रु





Great
ReplyDelete