राजमाता जिजाऊ बालवर्ग

राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्र ( वय ३ ते ६ वयोगट अध्ययन विभाग) ..... बालवर्ग 

         पानवडोद बु गावात आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणून प्रशाला प्रांगणात वय ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्र समाज सहभागातुन चालू करण्यात आले आहे. या अंतर्गत गावात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत अंगणवाड्या यांना प्रशाला प्रांगणात जागा व वर्गखोल्या व विविध आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यमान कार्यरत असलेल्या अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्या मदतीला गावकऱ्यांच्या सहभागातून ४ स्वयंसेवक शिक्षिका नेमण्यात आल्या आहेत.

            अंगणवाडी ताई , मदतनीस व स्वयंसेवक शिक्षिका यांच्या साह्याने हे बालवर्ग सकाळी ९.३० ते ४ या वेळात चालवले जातात. विद्यार्थ्यांचे ३ते ४ , ४ ते ५ , व ५ ते ६ असे ३ वयोगट केले असून त्या त्या वयोगटाच्या क्षमतेनुसार हसत खेळात व आनंददायी पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते.या बालवर्गात प्रत्येक वयोगटाचे ६० विद्यार्थी या प्रमाणे एकूण १८० विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात.


             राजमाता जिजाऊ बालवर्गातील विद्यार्थाना मराठी , इंग्रजी मुळाक्षरे वाचन लेखन  या सोबतच अंकगणित च्या मूलभूत क्रिया विविध शैक्षणिक साहित्य वापरून शिकवल्या जातात जेणे करून या बालवर्गातील विद्यार्थी जेव्हा वर्ग १ लीत प्रवेश घेईल तेव्हा त्याला इंग्रजी सोबतच मराठी व गणिताचे आवश्यक कौशल्य येत असल्यामुले तो आत्मविश्वासाने पुढील क्षमता प्राप्त करेल.

             
           प्रशाला व कें.प्रा.शा. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी शाळा बनवण्याच्या या प्रवासात राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्र निश्चितच महत्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही.
बालवर्ग सांभाळणारे आमच्या शिलेदार श्रीमती उज्ज्वला दौड व श्रीमती सुनीता तातडे मॅडम (स्वयंसेवक शिक्षिका) 


राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्र ची सुंदर इमारत 





राजमाता जिजाऊ बालकेंद्रातील विविध शैक्षणिक साहित्य 









 राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्रात विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिकताना 







उदघाटन सोहळा राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्र 

           
          

No comments:

Post a Comment