गौरवशाली इतिहास

                     प्रशाला व कें.प्रा.शाळेचा  दैदिप्यमान इतिहास  

                   भारतीय स्वतंत्रता संग्राम व मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दैदिप्यमान इतिहास असणारे पानवडोद बु गाव......! उज्वल ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक , सामाजिक परंपरेबरोबरच  गावाला लाभली आहे तेजस्वी शैक्षणिक परंपरा .....!! आणि या  शैक्षणिक परंपरेचे श्रेय जाते ते गावातील सन 1889 साली स्थापन  झालेल्या "जि. प. प्रशाला व कें.प्रा.शा. पानवडोद बु " या शाळेला ......!!!

                   "जि.प .प्रशाला व कें.प्रा.शा. पानवडोद बु " या शाळेचे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी संपूर्ण जिल्ह्यात राजकीय , सामाजिक, प्रशासकीय, व्यावसायिक , संरक्षण , शैक्षणिक , कृषी यासह विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावतांना दिसतात . 

                   या शाळेच्या  उभारणीलाच त्यागाची महान परंपरा लाभली आहे...आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार  शिक्षण लाभण्यासाठी त्या वेळी गावक-यांनी " श्रमदाना"तून प्रशालेची भव्य वास्तू उभारली ....या महान कार्यासाठी गावातील गोरगरीबांसह सर्व समाज घटकांनी  श्रमदानासह वेगवेगळ्या माध्यमातून आपले योगदान देऊन हा ज्ञान यज्ञ पेटवला .....गावातील सोन्ने व सिनकर कुटुंबियांनी आपली जमीन नाममात्र किमतीला या कार्यासाठी देऊन आपले दातृत्व सिद्ध केले  ...... आणि याच महान त्यागाच्या परंपरेतून उभी राहिली आहे  शाळेची भव्य  दिव्य दुमजली वास्तू .......!

                  या शाळेत  पानवडोद बु , इज्लापूर  ,पानवडोद खुर्द ,सारोळा, धोत्रा, धोंडखेडा, आन्वा , कारला, दिग्रस, जानेफळ , गोळेगाव  आदि ठिकाणाहून विद्यार्थी पायी ,अनवाणी व प्रचंड संघर्ष करीत शिकण्यासाठी येत असत....!

या शैक्षणिक संकुलात पेटवलेला हा ज्ञानाचा दीपक आजही तेजस्वीपणे प्रज्वलित आहे.....!! गावातील विद्यार्थ्यासह परिसरातील विद्यार्थी या शाळेच्या नाव लौकिकात आजही भर घालीत आहे ......!!!

                  संपूर्ण जिल्ह्यात  नवीन जागतिक संकल्पना स्वीकारून त्या यशस्वीपणे राबविणारी शाळा म्हणून या प्रशाला व कें.प्रा.शा. पानवडोद बु. ची  ओळख आहे ...शाळेने  नवीन आधुनिक रूप धारण केले  आहे......आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणप्रवाहा बरोबर ठेवण्यासाठी  ICT Computer Lab, अत्याधुनिक Science Lab, सन 2011 पासून Semi English माध्यम ,Agriculture , HealthCare या सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम , e -Learning साठी प्रत्येक Classrooms  मध्ये 32" Android LED TV संच या सारख्या संकल्पना  व उपक्रम आज प्रशालेत उपलब्ध आहे ......!!! 

                  भविष्यत पानवडोद बु गावातील मुलांना जगाच्या स्पर्धेत टिकवणारे शिक्षण मिळावे म्हणून आज हे शैक्षणिक संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे केंद्र व्हावे म्हणून गावातील सर्व तरुण मित्रमंडळ, पालक,ग्रामस्थ ,शिक्षकवृंद माता भगिनी झपाट्याने कामाला लागले असून लोकवर्गणी व समाजसहभागातून आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करण्याचे काम चालू आहे.
      
                    या अंतर्गत ५० Computer  ची अद्यावत lab , वय ३ ते ६ च्या मुलांसाठी परिपूर्ण व आंतरराष्ट्रीय दर्जाची अंगणवाडी, अद्यावत ग्रंथालय , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, IIT व NEET foundation Course चालू करणे, या सारखी कामे पूर्णत्वास जात आहेत.

                   प्रशालेचे हे वैभव व गौरवशाली परंपरा टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी आजही गावकरी व माजी विद्यार्थी यांची मोलाची साथ लाभत आहे .

              

                     येणाऱ्या काळात या शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा निर्धार  मुख्याध्यापक श्री पाटील  सर व श्री सुराडकर सर  यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षक वृन्दांनी केला आहे....!!!   

        

                

       

2 comments:

  1. समर्पक व वस्तवादी इतिहास लेखन .... भविष्य सुरक्षित व उज्वल होण्यासाठी team प्रशाला पानवडोद ला हार्दिक शुभेच्छा.... team प्रशाला पानवडोद चे अभिनंदन..... as a 1 ex student sinkar r. p..

    ReplyDelete
  2. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाकडे यशस्वीपणे वाटचाल👍

    ReplyDelete